Saturday 16 January, 2010

| घर साडेतीनशे वर्षापूर्वीचं |

त्या घराला लाभलय इतिहासाच लेणं |
आम्ही त्या साडेतीनशे वर्षाच्या घरातील माणसं,
म्हणूनच आम्ही लागतो,
याभूमीच्या दैदिप्यमान इतिहासाचं काही देणं ||

या घरात आहेत डझनावारी खोल्या,
छोटया पण,
साधणार्‍या एकमेकामंशी संवाद |
या खोल्यांत खूप नाहीत
पण राहतात थोडीशी माणसं,
मगं त्यांच्यात का उपटावेत उफराटे वाद ||

या घराच्या आहेत हातभर रुंद भिंती |
त्या गेल्यात किती खोल
व त्यांचा पाया किती रूंद,
याची मनाला नाही क्षिती ||
या घरांतील माणसं देखील अशी
ज्यांच्या मनाचा गाभारा खोलं |
पण मनाच्या नव्हे तर मानाच्या
भिंती आहेत जाडजुड आणि रुंद ||

या घराला आहे एक शिडी,
जी जाते तिथे आहे, एक ऊंच माडी |
या साडेतीनशे वर्षाच्या जुन्या
उंच माडी इतकीच प्रगल्भ,
प्रतिभावान आणि जगाला कवेत घेणारी
माणसांची फौज आहे,
जिच्या कर्तुत्वाला बांधु न शकणार
कुठलींच बेडी ||

या चौसोपी घरांत मधोमध
आहे एक चौपट |
जिथून घरात येत ऊन |
आणि आभाळ भरून आलं का
कोसळणारा पाऊसं |
पणं आश्र्चर्याची बाब म्हणजे
या घराला नाही पाणवठा |
म्हणजे घरातून घरात झेपावणार
जरी दिसलं आभाळांच पाणी |
तरी घागरी घेऊन जाव लागतंच
दुसर्‍यांच्या विहीरीवर पिढ्यानपिढ्या
गात तिच ती रडगाणी ||
सारांश हाच की मनातल्या ओल्याव्याने
प्रेमाची तहान घरातचं भागवली
तरं बाहेर जाईल का सांगा कोणी ||

या घराला आहे एक अंगण
जे घराच्या माञेत वाटतयं छोटं,
पणं उगांच असं वाटतयं की ते
नक्कीच असेलं कधीतरी मोठं ||
आपणंच आपल्याला कुरतडंत बसावं,
की मिळालेले वैभव जपांव
व समृध्द करांव, वैयक्तिक स्वार्थापुढं जाउंन |
ईच्छा ही की या अंगणात घरातील
माणसांबरोबर, घराबाहेर गेलेल्या
सगळ्यांनी येऊन घालावं
आनंदाचं रिंगणं ||

घरं कधीही हलंत नसंत
पणं माणसं असतात चालती,
पायांना लावून चाकं |
या घरांतील माणसांच्या
गाडीची दोन चाक धावतायतं पुढे,
मारायला जगाच्या फेर्‍या |
पणं मागची दोन चाक
राहतायतं मागे |
त्यांनी जरा येऊन पुढे
सांभाळली नाही,
पुढच्या चाकांची लय |
तरं पुढची चाक जातींल आभाळात उडून |
अन् मागची चाक जातीलं जमीनीवर कोलमडून ||

या घराला इतिहास आहे,
वर्तमान तर आहेचं, पण
भविष्याचा नाही ठावठिकाणा |
एकदा ते जाणारं होत विरून |
पणं सावरलं होत ते एका
महात्म्याने सगळ्यांना मारून हाकं
अन् त्यांची उभारून साथं |
असे महात्मे जन्मावे अशीच इच्छा
असेल या घराची पिढी दर पिढी |
याला जगवण्यासाठी, सावरण्यासाठी
आणि देण्यासाठी आधार |
कारणं या घरावरं नाही आपल्या
कोणाकोणाचेच उपकार ||

पणं आपल्याला आपला इतिहास
ठेवायचा असेल जागतां |
आपली मुळं असतील रोवायची
संस्कृतीच्या मातीत घट्ट |
घ्यायला कर्तुत्वाची गगन भरारी |

तरं वाढवावा लागेलं मनामनाशी संवाद |
वेचावे लागेल हुशारींने धनं |

कारणं जगात पैसे देऊन
मिळत नसतो इतिहास आणि
अभिमानानं करून छाताड रूंद
सांगता येणार खानदान ||

No comments:

Post a Comment