Sunday 24 January, 2010

चला वाटुया मनामनातील आनंद !

आपल्या जीवनातील आनंदाचे अनेक प्रसंग आपल्या घरापुरतेच मर्यादित राहतात. मग त्या यशाच्या घटना असोत अथवा आपल्या घरात साजरे होणारे वाढदिवसासारखे समारोह. चला वाटुया असे आनंदाचे प्रसंग, आपल्या माणसांशी, आपल्या या माध्यमातुन.

असे आनंदी प्रसंग कळवा. माझा मॊबाईल क्र. 9987539991, घरचा दुरध्वनी क्र. 022-23523753, ईमेलचा पत्ता anantmsawant@gmail.com तर घरचा पत्ता आहे E/17, बने कंपाऊंड, साने गुरुजी मार्ग, ताडदेव, मुंबई - 400 034 अशा आनंदाच्या प्रसंगाचे फ़ोटो अथवा व्हिडीओज देखील या माध्यमाला सुशोभित करतील.

कारण आपल्या आनंद हा आम्हा सार्‍यांचा आनंद आहे.

आपल्याला या ब्लौगवर लिहावयाचे असल्यास आपला ईमेलचा पत्ता कळवा.

अथर्व अनंत सावंत याचे होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेतील यश

होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेच्या २००९ - २०१० च्या प्रात्यक्षिक परिक्षेत कुमार अथर्व अनंत सावंत हा उत्तीर्ण झाला आहे व त्यानंतरच्या प्रक्ल्प व मुलाखतीसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

होमी भाभा बालवॆज्ञानिक परिक्षा ही तीन स्तरांवर घेतली जाते. प्रथम लेखी नंतर प्रात्यक्षिक व त्यानंतर प्रकल्प व मुलाखत असे या परिक्षेचे स्वरुप आहे. लेखी परिक्षेतुन प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ७.५ % विद्यार्थी निवडले जातात. तर प्रात्यक्षिक परीक्षेतुन प्रकल्प व मुलाखतीसाठी १० % विद्यार्थी निवडले जातात. प्रकल्प व मुलाखतीसाठी निवडले गेलेले विद्यार्थी हे रजत पदक पात्र असतात व त्यांची स्पर्धा ही सुवर्ण पदकासाठी असते.

अशा चाळ्णीतुन प्रकल्प व मुलाखतीसाठी निवड झालेल्या अथर्वचे आपण अभिनंदन करुया. त्याला बालवैज्ञानिक परिक्षेत रजत पदक मिळाले आहेच. पण सुवर्ण पदकासाठी त्याला आपण सुयश चिंतुया !

Wednesday 20 January, 2010

संदेशचा लगीन

येत्या ९ फ़ेब्रुवारीक आपल्या शिवरामबाबाचो झील
संदेशाचा ऊर्फ़ आत्मारामाचा लगीन असा ।

शिवरामबाबानं, त्याच्या बायलेन अन
आपल्या आजीयेन संगळ्यांका आवतण दिलेला असा ।

तुमका सगळ्यांका पञिका मिळाली असतलीच
पण ह्या स्पेशल आवतंण, चुकल्यामाकल्यांका ।

पोरीचा नाव असा निलीमा ।
वेंगुर्ल्याच्या श्री. गणपत शंकर गावड्यांची सुकन्या असा ती ।

९ फ़ेब्रुवारीक मंगळवार असा ।
मुहुर्त सकाळी ११ वा ४३ मिनीटांचो असा ।
विवाहस्थळ महालक्ष्मी मंगल कार्यालय ।
कुडाळातच असा ।
जास्त लांब जावची गरज नाय ।

तरी या मंगलसमयी अक्षतांची उधळण करुन
आपल्या सहवासाचो सुगंध या
आनंदाच्या सोहळ्याक लागावो अशीच
आपल्या समस्त प्रभावळकरांची इच्छा असतली,
यात काय शंकाच नाय ।

लग्नाक सगळ्यांनी जाऊया । पण,
लग्नाचे फ़ोटो मात्र माका पाठवुक विसरु नका ।

माझो इमेलचो पत्तो anantmsawant@gmail.com असा ।

भेटुया तर । संदेशाच्या लग्नात ।

Saturday 16 January, 2010

| घर साडेतीनशे वर्षापूर्वीचं |

त्या घराला लाभलय इतिहासाच लेणं |
आम्ही त्या साडेतीनशे वर्षाच्या घरातील माणसं,
म्हणूनच आम्ही लागतो,
याभूमीच्या दैदिप्यमान इतिहासाचं काही देणं ||

या घरात आहेत डझनावारी खोल्या,
छोटया पण,
साधणार्‍या एकमेकामंशी संवाद |
या खोल्यांत खूप नाहीत
पण राहतात थोडीशी माणसं,
मगं त्यांच्यात का उपटावेत उफराटे वाद ||

या घराच्या आहेत हातभर रुंद भिंती |
त्या गेल्यात किती खोल
व त्यांचा पाया किती रूंद,
याची मनाला नाही क्षिती ||
या घरांतील माणसं देखील अशी
ज्यांच्या मनाचा गाभारा खोलं |
पण मनाच्या नव्हे तर मानाच्या
भिंती आहेत जाडजुड आणि रुंद ||

या घराला आहे एक शिडी,
जी जाते तिथे आहे, एक ऊंच माडी |
या साडेतीनशे वर्षाच्या जुन्या
उंच माडी इतकीच प्रगल्भ,
प्रतिभावान आणि जगाला कवेत घेणारी
माणसांची फौज आहे,
जिच्या कर्तुत्वाला बांधु न शकणार
कुठलींच बेडी ||

या चौसोपी घरांत मधोमध
आहे एक चौपट |
जिथून घरात येत ऊन |
आणि आभाळ भरून आलं का
कोसळणारा पाऊसं |
पणं आश्र्चर्याची बाब म्हणजे
या घराला नाही पाणवठा |
म्हणजे घरातून घरात झेपावणार
जरी दिसलं आभाळांच पाणी |
तरी घागरी घेऊन जाव लागतंच
दुसर्‍यांच्या विहीरीवर पिढ्यानपिढ्या
गात तिच ती रडगाणी ||
सारांश हाच की मनातल्या ओल्याव्याने
प्रेमाची तहान घरातचं भागवली
तरं बाहेर जाईल का सांगा कोणी ||

या घराला आहे एक अंगण
जे घराच्या माञेत वाटतयं छोटं,
पणं उगांच असं वाटतयं की ते
नक्कीच असेलं कधीतरी मोठं ||
आपणंच आपल्याला कुरतडंत बसावं,
की मिळालेले वैभव जपांव
व समृध्द करांव, वैयक्तिक स्वार्थापुढं जाउंन |
ईच्छा ही की या अंगणात घरातील
माणसांबरोबर, घराबाहेर गेलेल्या
सगळ्यांनी येऊन घालावं
आनंदाचं रिंगणं ||

घरं कधीही हलंत नसंत
पणं माणसं असतात चालती,
पायांना लावून चाकं |
या घरांतील माणसांच्या
गाडीची दोन चाक धावतायतं पुढे,
मारायला जगाच्या फेर्‍या |
पणं मागची दोन चाक
राहतायतं मागे |
त्यांनी जरा येऊन पुढे
सांभाळली नाही,
पुढच्या चाकांची लय |
तरं पुढची चाक जातींल आभाळात उडून |
अन् मागची चाक जातीलं जमीनीवर कोलमडून ||

या घराला इतिहास आहे,
वर्तमान तर आहेचं, पण
भविष्याचा नाही ठावठिकाणा |
एकदा ते जाणारं होत विरून |
पणं सावरलं होत ते एका
महात्म्याने सगळ्यांना मारून हाकं
अन् त्यांची उभारून साथं |
असे महात्मे जन्मावे अशीच इच्छा
असेल या घराची पिढी दर पिढी |
याला जगवण्यासाठी, सावरण्यासाठी
आणि देण्यासाठी आधार |
कारणं या घरावरं नाही आपल्या
कोणाकोणाचेच उपकार ||

पणं आपल्याला आपला इतिहास
ठेवायचा असेल जागतां |
आपली मुळं असतील रोवायची
संस्कृतीच्या मातीत घट्ट |
घ्यायला कर्तुत्वाची गगन भरारी |

तरं वाढवावा लागेलं मनामनाशी संवाद |
वेचावे लागेल हुशारींने धनं |

कारणं जगात पैसे देऊन
मिळत नसतो इतिहास आणि
अभिमानानं करून छाताड रूंद
सांगता येणार खानदान ||

An Invitation to all Prabhawalkars

Distributed all over the world and missing a link to join our own brethren, relatives and freinds.

Our ancestors have started from Prabhawalkar Wada in a small town, Kudal and mingled in the cities and earned whatsoever they can in their small fists. They were always found together with their likings and with differences.

For us to come together physically is difficult but no matter, lets come together socially through this networking charm because we have not lost the love for the Prabhawalkar wada or (probably?) our brothers and relatives.

Now we have a platform to join together in this world, having a tremendous networking ability. Here we are at free will to share pleasure and display displeasure; reveal our own likings and dis likings; proffer guidance to the needy; share the news, great or small, in our personal lives; share the photographs of your family, friends, picnics and of nature; and express our own presence and absence in this social world.

Lets come and heal our own dissociation.

Please, please and please join together in this social brigade.

Please don't come empty handed. Come with ideas, decorations, pictures to embellish this site beautiful. Authoriship will be awarded generously to eligibles, to make this site successful.

With Regard,

Yours lovingly,

Anant Sawant (Nandu)